
सांगली, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा विधीमंडळात तातडीने पारित करावा, अशा मागणीचे निवेदन बत्तीस शिराळाचे भाजपचे आमदार श्री. सत्यजित देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. त्या वेळी त्यांनी ‘हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल’, असे आश्वासन समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखे’च्या वतीने जिल्ह्यातील सांगली, पलूस, कुंडल, कवठेमहांकाळ, विटा येथील प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. ‘लव्ह जिहाद’द्वारे सहस्रोंच्या संख्येने हिंदु मुली आणि महिला पळवल्या जात असून ‘लव्ह जिहाद’च्या घटनांविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मांडले. या मंडळात श्रीमती मधुरा तोफखाने, माजी नगरसेवक राजू गवळी, पुणदीच्या सरपंच सौ. पूनम पाटील, धर्मप्रेमी अरुण लकडे, सुरेखा खलिपे, हितचिंतक स्नेहलता भिंगारदिवे, सौ. मधुरा चव्हाण, अधिवक्त्या शुभांगी सपकाळ, मनोज गवळी, संतोष देसाई, सौ. स्मिता माईणकर आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते. कवठेमहांकाळ येथे निवेदन देतांना शिवसेना जिल्हा प्रमुख सौ. आशाताई पोतदार, रणरागिणी सौ. किरण सगरे, सौ. राणी माळी, सौ. प्रियांका माळी, सौ. अश्विनी पवार, सौ. माधुरी क्षीरसागर उपस्थित होते.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री. जितेंद्र मोरे, पलूस येथे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांना पुणदीच्या सरपंच सौ. पूनम पाटील यांनी निवेदन दिले. विटा येथे तहसीलदार श्री. योगेश टोणपे, कुंडल येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जयसिंग पाटील, पलूस येथील तहसीलदार दीप्ती रिटे (जाधव), तर कवठेमहांकाळ येथील नायब तहसीलदार श्री. केशर खुडे यांना हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन सादर !






उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !