अजित पवार विमान अपघात

काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांचा केवळ अपघात आहे कि घातपात, याचे स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही. सरकार याविषयी केवळ ‘दोन ओळींच्या स्पष्टीकरणात’ बोळवण का करत आहे ? देशभरात यावर चर्चा चालू असतांना सरकार मौन का बाळगून आहे. गेल्या एका महिन्यात यवतमाळमध्ये २२ आणि मराठवाड्यात ७६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हमीभावापेक्षा अल्प शुल्कात (उदा. मका १ सहस्र ५००-१ सहस्र ६०० रुपये) पिकांची खरेदी करून शेतकर्यांची लूट चालू आहे. कर्जापोटी चंद्रपूर येथील शेतकर्याला किडनी विकावी लागते, ही राज्यासाठी शरमेची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. जर सरकारकडे दावोस येथे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले असतील, तर ‘लाडक्या बहिणींना’ १ सहस्र ५०० ऐवजी ३ सहस्र रुपये का दिले जात नाहीत ? सरकारी कामांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कमिशनखोरी चालू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. दावोसमध्ये झालेले करार आणि राज्यातील प्रत्यक्ष गुंतवणूक यावर सरकारने ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !