
बांदा (उत्तरप्रदेश) – येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने राम भवन (वय ४८ वर्षे) आणि त्याची पत्नी दुर्गावती (वय ४५ वर्षे) यांना लहान मुलांचे लैंगिक
शोषण आणि त्यांच्याशी संबंधित अश्लील सामग्री ऑनलाईन प्रसारित केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली. राम भवन उत्तरप्रदेश पाटबंधारे विभागातील निलंबित कनिष्ठ अभियंता आहे.
UP POCSO Court awards death penalty to a couple who abused 33 children over a decade (2010–2020) in Banda & Chitrakoot, producing and selling obscene content online.
₹10 lakh compensation ordered for each victim.
For crimes against children, the strictest punishment is not… pic.twitter.com/j5CW05fRqW— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2026
सीबीआयने आरोप केला होता की, राम भवन याने बांदा, चित्रकूट आणि जवळच्या भागांत गेल्या दशकापासून मुलांचे लैंगिक शोषण केले आणि किमान ५० अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले. या कृत्याचे ३४ व्हिडिओ आणि ६७८ छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली, तसेच अश्लील संकेतस्थळांना विकले. त्याच्या निवासस्थानी केलेल्या झडतीत रोख रक्कम, लॅपटॉप, एक वेब कॅमेरा, पेन ड्राइव्ह आणि मेमरी कार्डसह इलेक्ट्रॉनिक स्टोरेज उपकरणे अन् इतर गुन्हेगारी साहित्य जप्त केले.
सीबीआयने म्हटले होते की, आरोपीच्या इमेल खात्यांच्या तपासणीत दिसून आले की, तो बाल लैंगिक शोषण साहित्य प्रसारित करण्याच्या उद्देशाने भारतीय आणि परदेशी नागरिकांसह अनेक व्यक्तींशी नियमित संपर्कात होता.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या प्रत्येक गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक झाले आहे ! |
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !