यादव समाजाची भावना दुखावल्याचे प्रकरण

नवी देहली – ‘यादव जी की लव स्टोरी’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. यादव समाजातील लोकांनी केलेल्या तक्रारीनंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात निर्माता संदीप तोमर, दिग्दर्शक अंकित भडाणा, मुख्य अभिनेत्री प्रगती तिवारी आणि अभिनेते विशाल मोहन यांचा समावेश आहे. चित्रपट २७ फेब्रुवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
१. चित्रपटाचे नाव आणि कथानक यादव समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. चित्रपटात समाजाचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून त्यामुळे संपूर्ण समाजाची प्रतिमा मलिन होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. या आधारावर चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
२. गेल्या काही दिवसांपासून संभल आणि परिसरात या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन चालू होते. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून चित्रपटाचे भित्तीपत्रक जाळले होते. काही ठिकाणी चित्रपटगृह संचालकांनाही चेतावणी देण्यात आली होती की, चित्रपट प्रदर्शित झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.
चित्रपटात हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांची प्रेमकथा
चित्रपटात यादव समाजातील तरुणी आणि मुसलमान तरुण यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. (मुसलमान तरुणी आणि हिंदु तरुण असा चित्रपट काढण्याचे धाडस हिंदु निर्माते, दिग्दर्शक का दाखवत नाहीत ? – संपादक) यामुळे समाजाची प्रतिमा मलिन होत असून भावना दुखावल्या गेल्याचा आरोप यादव समाजाने केला आहे.
चित्रपटाचे नाव आणि कथानक जाणूनबुजून यादव समाजाला लक्ष्य करते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट चालू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !