प्रदर्शनाला खासदार, आमदार, नगरसेवक आणि अन्य मान्यवर यांच्या उत्स्फूर्त भेटी !

मुंबई – मुंबई, नवी मुंबई आणि वसई-विरार भागांतील शिवमंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला सहस्रो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, तसेच अन्य मान्यवर यांनीही प्रदर्शनाला उत्स्फूर्त भेट दिली. ग्रंथप्रदर्शनाला भेट देणार्या सर्व मान्यवरांना २३ आणि २४ मे या दिवशी होणार्या ‘शंखनाद रामराज्यका’ या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.
ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे मान्यवर !


















माजी खासदार संजीव नाईक, भाजप आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, शिवसेनेचे आमदार दिलीप (मामा) लांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे, प्रकाश फातरपेकर यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली, तसेच भाजपचे नगरसेवक सचिन लवटे, सूरज पाटील, योगेश सिंग, पंकज देशमुख, रोहिदास लोखंडे, गिरीश म्हात्रे, गणेश खणकर, सौ. अनिता वैती, सौ. योगिता पाटील, सौ. रेश्मा मढवी, सौ. प्रीती भोपी, अधिवक्त्या सपना गावडे, तसेच शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर, कु. ऐश्वर्या सोनावणे, सौ. हेमांगी सोनावणे यांनीही सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मनसेचे विभागप्रमुख दशरथ शिर्के, माजी आमदार मधू चव्हाण, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दीपक सावंत, तसेच उलवे येथील प्रवचनकार श्री. रामनाथ घरत आणि ‘जंगलेश्वर मंदिर ट्रस्ट’चे विश्वस्त श्री. कैलास सुर्वे यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.
या वेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन हे आपले आहे. शंखनाद महोत्सवाला मी नक्की येणार. हा आपलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी काही साहाय्य लागल्यास अवश्य सांगा. मी स्वतः साहाय्य करीन !’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !