
ठाणे, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंब्रा येथे दुचाकीवर मागील आसनावर बसलेल्या एका ६२ वर्षीय चहा विक्रेत्याला भरधाव रिक्शाची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. रामाज्ञा गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी महंमद कैफ रिझवान खान (वय २२ वर्षे) या रिक्शाचालकाच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंब्रा येथील बेशिस्त धर्मांध रिक्शाचालकांकडून बर्याचदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. बर्याच रिक्शांना मीटर बसवलेले नाहीत, रिक्शाचालकांकडून चालकाच्या शेजारी प्रवासी बसवून रिक्शा चालवली जाते, गणवेश नसणे, बॅच नसणे, रिक्शा सुस्थितीत नसणे, अधिक भाडे आकारणे, अशा विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते; मात्र पोलीस त्यांच्यावर ठोस कारवाई करतांना दिसत नाहीत, असे मुंब्रा येथील नागरिकांना वाटते. (याला उपप्रादेशिक परिवहन विभागही तितकाच उत्तरदायी आहे ! – संपादक) प्रशासनाने याची गंभीर नोंद घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
संपादकीय भूमिका :रिक्शाचालक बेशिस्तपणे वागण्यास उत्तरदायी असणार्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्यांवरही कारवाई होणे आवश्यक ! |
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !