काँग्रेसने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आदल्या दिवशी प्रेमी युगुलांना केले होते आवाहन

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु संघटनांची पर्वा करू नका, व्हॅलेंटाईन डे बिनधास्तपणे साजरा करा, असे संस्कृतीहीन आवाहन राज्य युवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष एच्.एस्. मंजुनाथ गौडा यांनी तरुण-तरुणींना व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी केले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या मते, प्रेम आणि जोडीदाराची निवड हा एक मूलभूत अधिकार आहे. व्यक्तीला जात आणि धर्म यांच्या अडथळ्यांविना, परस्पर संमतीने निवडलेल्या जोडीदारावर प्रेम करण्याचे आणि त्याच्यासमवेत जगण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रेमी युगुलांच्या अधिकारांना बाधा आणणारे कोणतेही कृत्य आम्ही खपवून घेणार नाही, असे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाभारतीय संस्कृतीशी काहीही देणेघेणे नसलेल्या काँग्रेसमुळेच देशाची नैतिक अधोगती झाली आणि अजूनही ती होण्यासाठी अशा प्रकारे खतपाणी घातले जात आहे. भारत काँग्रेसमुक्त झाल्याखेरीज भारताला चांगले दिवस येणार नाहीत ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !