
हडपसर (जिल्हा पुणे), १० फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्योत्तरकाळात हिंदु संघटित नसल्यामुळे ते आपल्याच देशात अल्पसंख्यांक होत चालले आहेत. ‘वक्फ कायदा’, ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या माध्यमांतून भारताच्या इस्लामीकरणाचा पद्धतशीर कट रचला जात आहे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल आणि अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांनी येथे केले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने महादेववाडी (हडपसर) येथे ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त ते बोलत होते.
या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले यांनी समितीच्या चालू असलेल्या कार्याविषयी आढावा मांडला. हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्यांवर उपायांची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करतांना महिलांनी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण घेणे ही काळाची आवश्यकता असून त्यासाठी महिलांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन केले. या सभेला १५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सभेचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने झाला. या वेळी गोरक्षण आणि धर्मकार्य करणारे कु. शिवांश शुक्ला याचा सत्कार अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आला.

अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे पुढे म्हणाले की, १९९५ च्या वक्फ कायद्याचा चुकीचा वापर करून देशातील ८ लाख एकरांहून अधिक भूमी बळकावली असून रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक भूमी आहे. पुण्यात १ सहस्र २०० पेक्षा अधिक मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी म्हणून घोषित केल्या आहेत. कोणतीही जागा ‘इस्लामी धर्मकार्य’ सांगून लाटण्याचा प्रकार वाढला आहे. धर्म टिकला, तरच आपण टिकू शकतो. छत्रपती संभाजीराजे यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित व्हायला हवे.

वैशिष्ट्यपूर्ण !
१. मोठ्या संख्येने सभेमध्ये तरुण मुले उपस्थित होती.
२. महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३. सर्व तरुण धर्मप्रेमींनी कार्यक्रमानंतर वक्त्यांची भेट घेऊन पुढील कार्यासाठी मार्गदर्शन घेतले.
४. स्वागत कक्षाजवळ लावण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण कक्षालाही सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सहकार्य !
१. रणरागिणी सौ. कार्तिकी घुले यांनी ८ दिवस सभा प्रसाराची सेवा तळमळीने केली, तसेच प्रसाराला येणार्या महिला साधिकांसमवेत घरोघरी प्रसाराला वेळ दिला, प्रत्येक बांधवांना सभेला येण्यासाठी उद्युक्त करून सभेच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.
२. हिंदुत्वनिष्ठ श्री. गणेश शेवाळे आणि श्री. आप्पेश घुले यांनी कार्यकर्त्यांच्या अल्पोपहाराची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
३. हिंदुत्वनिष्ठ श्री. बाळा घुले यांनी सभेच्या प्रसिद्धीसाठी फ्लेक्स प्रायोजित केले.
४. हिंदुत्वनिष्ठ श्री. रवि घुले आणि श्री. सुहास घुले यांनी सभेच्या आयोजनाच्या अंतर्गत अनेक सेवांमध्ये पुढाकार घेतला आणि कार्यकर्त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.
५. सभेच्या प्रसारासाठी धर्मप्रेमी श्री. शिवांश शुक्ला यांनी ३ ते ४ दिवस वेळ दिला. आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक ठिकाणी प्रसारासाठी आवश्यक ते साहाय्य केले. याचबरोबर धर्मप्रेमी श्री. सौरभ घुले यांनीही आपल्या अनेक कार्यकर्त्यांना सभेचे निमंत्रण तळमळीने दिले. श्री. प्रणय वाडकर, श्री. ओम दुबे, श्री. जनार्दन दुबे आणि श्री. प्रसाद आठवले यांनी आपल्या घराजवळील सर्वांना सभेचे निमंत्रण दिले.
६. धर्मप्रेमी श्री. शुभम डोणवाडे, श्री. अथर्व खडसरे, श्री. देव बुर्हाडे हे नियमित ऑफिस वरून येऊन रात्री २ ते ३ तास प्रसार सेवेसाठी देत आणि यांनी अनेक धर्मप्रेमींना या सभेच्या प्रसार सेवेत आणि आयोजन सेवेत सहभागी करुन घेतले. धर्मप्रेमींना दररोज प्रसाराला बोलवणे, त्यांचे नियोजन करणे, त्यांना सेवेसाठी उद्युक्त करणे आदी उत्साहाने केले.
७. याचबरोबर नियमित प्रसार करण्यासाठी धर्मप्रेमी श्री. ओंकार साळुंखे, श्री. सतीश गायकवाड, श्री. ऋतुराज वंझारी, श्री. संग्राम राजले, श्री. शुभम लव्हे, श्री. प्रसाद ठाकरे, श्री. अभिषेक भांड, श्री. ओंकार निरगुडे आपापल्या वैयक्तिक अडचणी बाजुला ठेऊन तळमळीने प्रसार करत होते.
८. काळानुसार संरक्षणाची आवश्यकता या विषयाअंतर्गत प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी कु. संचेती जाधव आणि कु. मयुरी मोरे यांनी ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन केले. महिलांना सभेला येण्यासाठी उद्युक्त केले.
लव्ह जिहाद आणि लोकसंख्यावाढीचे नियोजित षड्यंत्र !
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना भावनिक जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर केले जात आहे, तसेच १९४७ मध्ये भारतात ८.१ टक्के असलेली मुसलमानांची लोकसंख्या वर्ष २०२६ पर्यंत २० टक्केच्या आसपास पोचण्याची शक्यता असून याला त्यांनी ‘पॉप्युलेशन जिहाद’ संबोधले. ‘पी.एफ्.आय.’सारखी संघटना भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पहात असून त्यासाठी नियोजनबद्ध काम करत आहे.
उपस्थित मान्यवर !भाजपचे नगरसेवक श्री. अतुल नारायण तरवडे, भाजपच्या नगरसेविका सौ. प्राची आल्हाट, महादेववाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त श्री. बाळासाहेब घुले, श्री. आप्पेश घुले आणि श्री. अंकुश घुले, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रवि घुले, बाळा घुले, सुहास घुले, गणेश शेवाळे, शिवप्रेमी हनुमान मंदिराचे अध्यक्ष श्री. सुनील आप्पा घुले |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव