२६९ कोटी रुपये थकवणारे ३ कॅसिनो बंद, तर ४५ कोटी रुपये थकवलेले कॅसिनो चालू !

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – महसूलप्राप्तीसाठी सरकार कॅसिनोंना अनुमती देत असली, तरी अनेक कॅसिनोंनी सरकारचा महसूल बुडवला आहे. सरकारचे २६९ कोटी रुपये थकवणारे ३ कॅसिनो बंद झालेले आहेत, तर ४५ कोटी रुपये थकवलेले कॅसिनो सध्या चालू आहेत. कॅसिनोंकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी असतांनाही आता मांडवी नदीत मोठ्या कॅसिनो नौकेला अनुमती देण्याच्या हालचाली चालू आहेत. (सरकारचा म्हणजे जनतेचाच महसूल कॅसिनोंनी थकवला आहे. त्यामुळे अशा कॅसिनोंना प्रशासनाचे मांडवी नदीतून हाकलून लावणेच योग्य ठरेल ! – संपादक)
बंद पडलेले कॅसिनो आणि त्यांची थकबाकी
१. ‘ला कॅलिप्सो हॉटेल्स प्रा. लि.’ची १०७ कोटी ११ लक्ष रुपये
२. ‘बोगमाळो बीच रिसोर्ट’वरील ‘मेसर्स ट्रेड विंगस कॅसिनो’ची ८२ कोटी ७० लक्ष रुपये (थकबाकीचा कालावधी १२ फेब्रुवारी २०१८ ते ३१ मार्च २०२२)
३. ‘नोवोटेल गोवा श्रेम रिसॉर्ट’वरील ‘मेसर्स एम्केएम् ग्रॅड गेमिंग’ची ८० कोटी रुपये
चालू असलेले कॅसिनो आणि त्यांची थकबाकी
१. ‘मे. ब्रिटो अॅम्युझमेंट’, हॉटेल वायंगिणी वॅली – २ कोटी ५० लक्ष रुपये
२. ‘मे. रॅफल्स स्क्वेअर डेव्हलपमेंट’, द ओ हॉटेल – ७ कोटी ५० लक्ष रुपये
३. ‘बीग बी लेजर’, हॉटेल रियो रॉयल – १४ कोटी रुपये
४. ‘मे. मॅचोस एंटरटेन्मेंट’, अॅवेन्यू ग्रँड हॉटेल, कळंगुट – १८ कोटी रुपये
५. ‘मे. गोल्डन ग्लोब हॉटेल्स’, एम्.व्ही. लकमी सेवेन व्हेसल – २ कोटी ७५ लक्ष रुपये
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !