मुंबई – बांगलादेशात हिंदूंवर वारंवार आक्रमणे केली जात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. अनेक हिंदूंची भर रस्त्यात हत्या केली जात असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांनी बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदूंना अत्याचारांच्या विरोधात आणि त्यांच्या अधिकारासाठी उभे राहिले, तर जगभरातील हिंदू त्यांना साहाय्य करतील, असे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. ते वरळी डोम, मुंबई येथील कार्यक्रमात दुसर्या दिवशीच्या सत्रात संबोधित करत होते.
बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आणि भारतविरोधी कट्टरपंथी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या झाल्यावर बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.

डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा