
मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा’, अशी मागणी होत आहे. सध्या केंद्रात भाजपची सत्ता असूनही सावरकर यांना अजूनही ‘भारतरत्न पुरस्कार’ का मिळाला नाही ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, ‘‘सावरकर लाखो, कोट्यवधी हृदयांचे सम्राट बनले आहेत. त्या (संबंधित) समितीत मी नाही, जर त्या समितीमधील कुणी मला भेटले, तर त्यांना मी नक्की विचारीन.’’ वरळी डोम येथे चालू असलेल्या २ दिवसांच्या कार्यक्रमात दुसर्या दिवशी अनेकांनी त्यांना यावरून प्रश्न विचारले. त्या वेळी ते बोलत होते.
सावरकर यांना ‘भारतरत्न’ दिले, तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढेल ! – रणजित सावरकर
श्री. रणजित सावरकर यांनी प.पू. सरसंघचालकांच्या विधानाला स्वीकृती दर्शवली. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्काराची अपेक्षा कधीच नव्हती. आम्हा सावरकर कुटुंबियांचीसुद्धा आधीपासूनच ही भूमिका आहे की, त्यांच्यासाठी कोणत्याही पुरस्काराची मागणी करणार नाहीत. सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळाल्याने त्यांचा सन्मान होईल, असे आम्हाला वाटत नाही. उलट सावरकरांमुळे त्या पुरस्काराचाच सन्मान वाढेल. जनतेने सावरकर यांना आधीच ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी देऊन त्यांचा सर्वांत मोठा गौरव केला आहे. सरकारने ही ‘स्वातंत्र्यवीर’ पदवी अधिकृत करावी, अशी आम्ही विनंती करतो.
विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
मुंबई – पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. विदेशी भाषांचा वापर टाळावा. मुलांशी घरी मातृभाषेतून संभाषण करावे. मातृभाषेचा वापर वाढला पाहिजे. ‘मम्मी-डॅडी’ म्हणण्यापेक्षा आई-वडील असेच म्हटले पाहिजे, असे मत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. येथील वरळी डोम येथे चालू असलेल्या २ दिवसांच्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, राज्यघटना यांवर आधारित नागरी कर्तव्यांचे पालन करा !
या वेळी प.पू. सरसंघचालक म्हणाले की, संघाला जाणून घ्यायचे असेल, तर संघ शाखांचा अनुभव घ्यावा. संघाची शाखा, कार्यकर्ते, शिबिरे आदींचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास संघ यथार्थ समजेल. कितीही आरोप अथवा टीका झाली, तरी संघाचे काम सतत चालू असते. संघाला प्रसिद्धीचा सोस नाही. सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, राज्यघटना यांवर आधारित नागरी कर्तव्यांचे पालन यांवर भर द्या.
वीर सावरकर उवाच
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री