मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे घेतली ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट

साखळी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी सांखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूट, पद्मिनी फाऊंडेशन येथे ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या संवादाविषयी सामाजिक माध्यमातील स्वतःच्या ‘एक्स’ खात्यावरून माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पू. संभाजी भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतांना आनंद झाला. देव, देश, धर्म, तसेच शारीरिक तंदुरुस्ती या मूल्यांवर भर देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शांमधून प्रेरणा घेऊन संभाजी भिडेगुरुजी सातत्याने तरुण पिढीला मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहेत. त्यांचे विचार तरुणांमध्ये शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सशक्त सांस्कृतिक अभिमान निर्माण करण्यासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहेत.’’
भगवा हा भारताचा पुरातन काळापासून राष्ट्रीय ध्वज ! – पू. संभाजी भिडे गुरुजी

डिचोली, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – भगवा हा भारताचा पुरातन काळापासून राष्ट्रीय ध्वज आहे, असे प्रतिपादन ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. डिचोली येथे ८ फेब्रुवारी या दिवशी पू. संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते २ ठिकाणी धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. श्री कुळणेश्वर मंदिर आणि वन, डिचोली येथील भगवान नित्यानंद मठ येथे हे ध्वर्मध्वज स्थापन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी हे विधान केले. याप्रसंगी शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान