लव्ह जिहादचा आरोप

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील एका अतिथीगृहात (गेस्ट हाऊसमध्ये) २ मुसलमान युवकांसमवेत अल्पवयीन हिंदु मुलगी आढळली आहे. अखिल भारत हिंदु महासभेशी संबंधित कार्यकर्त्यांनी अतिथीगृहावर धाड घातली. नागपूर येथील रहिवासी असलेल्या मुलीला मुसलमान युवकांसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटले आहे.
🚨 Nagpur Link in Shocking Case 🚨
Two Muslim youths caught with a minor Hindu girl – all from Nagpur – at a guest house in Mathura. 🚩
⚠️ Love Jihad Allegation: Fake Aadhaar used to pass the minor off as a “wife” for entry.
Public anger is rising. Without the strictest… pic.twitter.com/LBDGutLNcq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2026
बनावट आधारकार्डद्वारे मुलीला पत्नी म्हणून दाखवले !
मुसलमान युवकांनी अल्पवयीन हिंदु मुलीचे बनावट आधारकार्ड बनवून तिला प्रौढ दाखवले. तसेच तिला पत्नी म्हणून दर्शवून अतिथीगृहात खोली घेतली होती. या मुलीचा शोध महाराष्ट्रातील नागपूर पोलीस घेत होते. आरोपी युवकांनी मुलीला प्रेमजाळ्यात अडकवून नागपूरहून मथुरेला आणले होते.
बनावट आधारकार्ड कसे सिद्ध झाले ?
अल्पवयीन हिंदु मुलीचे बनावट आधारकार्ड नेमके कुणी सिद्ध केले, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत आहे का, जे अल्पवयीन हिंदु मुलींना लक्ष्य करून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांना प्रौढ दर्शवते, याचे अन्वेषण पोलीस विविध अंगांनी करत आहेत.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद प्रकरणात जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत ! |
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा