
पणजी, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा पुस्तक महोत्सव’ ज्ञानकेंद्र बनल्याचे चित्र आहे. येथे कला, साहित्य, खेळ, विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, अध्यात्म आदी विविध विषयांवरील शेकडो पुस्तके एकाच ठिकाणी मिळत आहेत.
या पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत या प्रदर्शनाला सहस्रो लोकांनी भेट देऊन विविध विषयांवरचे ग्रंथ विकत घेतले .

या महोत्सवाविषयी माहिती देतांना ‘दैनिक तरुण भारत’चे गोवा आवृत्तीचे संपादक श्री. सागर जावडेकर यांनी सांगितले की, या महोत्सवात विविध प्रकाशकांचे ९३ स्टॉल आहेत. १०० हून अधिक प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध आहेत. सकाळच्या वेळेत गोव्याच्या विविध भागांतील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांचे विद्यार्थी ग्रंथप्रदर्शनाला भेट देत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालकांना आणि मुलांना आवाहन केल्याप्रमाणे अनेक विद्यालयांची आणि उच्च माध्यमिक विद्यालयांची मुले या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
सनातनचे ग्रंथप्रदर्शन बनले आकर्षण !

गोवा पुस्तक महोत्सवातील स्टॉल क्र. ७ येथे सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाला माजी खासदार नरेंद्र सावईकर, ह.भ.प. सुहासबुवा वझे, गोमंतक मराठी अकादमीचे श्री. आनंद मयेकर, गोवा कला अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या धर्मपत्नी सौ. सुलक्षणा सावंत आदी मान्यवरांनी भेट दिली.
सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्यात आलेल्या अनेक विदेशी पर्यटकांनीही भेट दिली. त्यांनी अध्यात्म, आचारधर्म यांविषयी जिज्ञासेने माहिती जाणून घेतली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !