Naseeruddin Shah : (म्हणे) ‘ज्या देशात मी मोठा झालो आणि ज्या देशावर प्रेम करायला शिकलो, तो हा देश नाही !’ – अभिनेते नसीरुद्दीन शाह

मुंबई विद्यापिठाने ऐनवेळी कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्याचे प्रकरण

नसीरुद्दीन शाह

मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या उर्दू विभागाने १ फेब्रुवारी या दिवशी ‘जश्न-ए-उर्दू’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना आमंत्रण देण्यात आले होते; पण ३१ जानेवारीच्या रात्री ते रहित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना सांगण्यात आले की, शाह यांनी उपस्थित रहाण्यास नकार दिला आहे. याविषयी शाह म्हणाले, ‘‘ज्या देशात मी मोठा झालो आणि ज्या देशावर प्रेम करायला शिकलो, तो हा देश नाही.’’

ते म्हणाले, ‘‘झालेला प्रकार अपमानकारक आणि अन्याय्य आहे. मी कधीही कार्यक्रमाला येण्यास नकार दिला नाही. माझ्या ४ दशकांच्या कारकिर्दीत मी अनेकदा विद्यार्थ्यांना भेटलो आणि शिकवले आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंददायी अनुभव आहे. असे असतांना मी आमंत्रण रहित का करू ? निमंत्रण रहित होण्याचे खरे कारण माझे राजकीय विचार असू शकतात. एका वरिष्ठ अधिकार्‍याने आरोप केला आहे की, मी देशविरोधी विधाने करतो. प्रत्यक्षात त्यांनी माझे एकतरी देशविरोधी विधान दाखवून द्यावे.’’

संपाकीदय भूमिका

  • नसीरुद्दीन शाह यांचे पाकप्रेम किंवा मोगलांविषयी असलेला पुळका भारतीय जाणून आहेत ! धर्मांध विचारसरणी असलेल्यांची मानसिकता जनता ओळखून आहे !
  • ‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) एका रात्रीत नष्ट करू शकत नाही. मुसलमानांवर आक्रमण झाले, तर आम्ही या विरोधात लढा देऊ’, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. हिंदू त्यांचे हे विधान विसरलेले नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
  • भारताचे इस्लामीकरण करण्याचे मनसुबे रचणार्‍यांच्या अशा विधानांना हिंदूंनी भुलू नये !