पाकिस्तानच्या जिहादी मानसिकतेच्या यू ट्यूबरची धमकी
(‘यू ट्यूबर’ म्हणजे यू ट्यूबवर व्हिडिओ प्रसारित करणारा)

नवी देहली – टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतासमवेतचा सामना खेळण्यास पाकने नकार दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने पाकवर कडक कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. यावर पाकमधील यू ट्यूबर अर्सलान नसीर याने या मंडळाला धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्याने म्हटले आहे की, या मंडळाचे कार्यालय दुबई येथे आहे. जर ते भारतात असते, तर आम्ही क्षेपणास्त्राद्वारे उडवून दिले असते. या छोट्याशा कार्यालयामध्ये २५ जण बसतात आणि चित्रपट पहात असतात. अशांचे पाक सरकारला उत्तर देण्याचे धाडस कसे झाले ? पाकिस्तान सरकार कोण आहे, हे त्यांना ठाऊक नाही. पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचा बाप आहे. रॉकेट डागले जाईल आणि २ खोल्यांचे कार्यालयही उरणार नाही. जय शहा (मंडळाचे अध्यक्ष) यांचे केवळ कपडेच शिल्लक रहातील. दुबईत सुरक्षित बसल्याबद्दल आभार माना, असेही तो म्हणाला.
संपाकीदय भूमिकापाकिस्तानच्या सैनिकांना बलुचिस्तानचे स्वातंत्र्यसैनिकांनी काही दिवसांपूर्वी चांगलीच अद्दल घडवली होती. पाकिस्तान भिकेला लागला असतांना आणि त्याचे तुकडे होण्याची शक्यता असतांना तेथील नागरिक कशा प्रकारे दिवास्वप्न पहात आहेत, याचे उदाहरण ! |
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी