|

गुंटूर (आंध्रप्रदेश) – येथे विरोधी राजकीय पक्ष असलेल्या वाय.एस्.आर्. काँग्रेसचे (युवाजन श्रमिक रायथू (शेतकरी) काँग्रेसचे) अध्यक्ष अंबाती रामबाबू यांनी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना शिवीगाळ केली. यावरून सत्ताधारी तेलगू देसम् पक्षाच्या (‘टीडीपी’च्या) कार्यकर्त्यांनी रामबाबू यांच्या घरावर आक्रमण केले. पोलिसांनी तक्रारीनंतर रामबाबू यांना त्यांच्या घरातून अटक केली. आता वाय.एस्.आर्. काँग्रेसने यावरून राजकारण करण्यास आरंभले आहे.
रामबाबू यांनी नायडू यांच्या विरोधात अपशब्द म्हटल्यानंतर टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी गुंटूरच्या रस्त्यांवर, तसेच रामबाबू यांच्या घराजवळ अनेक तास आंदोलन केले. त्यानंतर अंबाती यांच्या घराची आणि गाड्यांची तोडफोड केली, तसेच आगही लावली. रामबाबू हे यापूर्वीच्या सरकारमध्ये जलसंपदामंत्री होते.
(म्हणे) ‘सरकारला प्रश्न विचारणार्यांचा आवाज दाबण्याचे सुनियोजित षड्यंत्र !’ – वाय.एस्.आर्. काँग्रेसचा आरोपमुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणे, हा सरकारच्या विरोधात आवाज उठवणे आहे, असे म्हणणार्या वाय.एस्.आर्. काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी यातून स्पष्ट होते ! वाय.एस्.आर्. काँग्रेसने आरोप केला की, रामबाबू यांच्यावर जीवघेणे आक्रमण करण्यात आले. त्यांच्या जिवाला गंभीर धोका आहे. आंध्रप्रदेशात जंगलराजसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री नायडू कथितपणे अराजकता आणि राजकीय सूड यांच्या वातावरणाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. सरकारला प्रश्न विचारणार्या आवाजांना घाबरवण्यासाठी जाणूनबुजून असे केले जात आहे. हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे. |
संपाकीदय भूमिकाभारतीय राजकारणाचे सुमार दर्शन घडवणारी ही घटना ! विरोधी राजकीय पक्षाचे अध्यक्ष घटनात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्याला शिवीगाळ करतात, हे संतापजनक ! दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या घरावर आक्रमण करतात, हेसुद्धा अस्वीकारार्हच. अशाने ‘यथा राजा तथा प्रजा’नुसार राज्यातील जनतेसमोर कोणता आदर्श निर्माण होत आहे, हे वेगळे सांगायला नको ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !