शिवना (छत्रपती संभाजीनगर) येथे घराच्या बांधकामात भव्य पुरातन भुयार उघडकीस !

पुरातन भुयार

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जैन समाज मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे अशोक भगवान वाघ यांच्या घराच्या स्वच्छतागृहासाठी २६ जानेवारी या दिवशी खोदकाम करतांना मंदिरासारखी कळसाकृती, घुमटाकार भुयार सापडल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. अनुमाने ८०० चौ. मीटर क्षेत्रातील या भुयारात जुने विटा-दगडांचे बांधकाम असून भिंतींमध्ये दिवे लावण्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. भुयाराची खरी ओळख अद्याप स्पष्ट नसल्याने पुरातत्व विभागाला माहिती देऊन पुढील काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. गावकर्‍यांमध्ये येथे साधू, संत किंवा प्राचीन वास्तू असण्याची चर्चा चालू आहे.