
राजापूर – बँकेच्या सभासदांना अपेक्षित अशी बँकेची दैदीप्यमान कारकीर्द निर्माण होण्यावर भर दिला जाईल आणि सभासदांचा विश्वास दृढ केला जाईल, असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष अधिवक्ता शशिकांत सुतार यांनी दिले. २९ जानेवारी या दिवशी येथील राजापूर अर्बन बँकेवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ते बोलत होते. सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलने निश्चित केलेल्या धोरणानुसार बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची एक वर्षाची मुदत संपल्याने राजापूरचे साहाय्यक निबंधक संतोषकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारीला संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत येथील प्रतीथयश अधिवक्ता शशिकांत सुतार यांची अध्यक्षपदी, तर व्यापारी विवेक गादीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या वेळी बँकेचे मावळते अध्यक्ष संजय ओगले आणि उपाध्यक्ष विजय पाध्ये, तसेच सर्व संचालकांसह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदि उपस्थित होते.
राजापूर अर्बन बँकेवर सर्वपक्षीय सहकार पॅनेलची पूर्ण बहुमताने सत्ता आहे. सहकार पॅनेलच्या प्रारंभीपासूनच धोरणानुसार सर्व संचालकांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी संधी देता यावी, यासाठी या दोन्ही पदांचा कार्यकाळ एक वर्षाचा संपल्यामुळे मावळते अध्यक्ष संजय ओगले, तर उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी स्वतःच्या पदाचे त्यागपत्र दिले होते.
या निवडीनंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पत्रकार संघासह विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार आदींनी भेट घेऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !