केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय
(फिजिओथेरपी म्हणजे शारीरिक चिकित्सा किंवा भौतिक उपचार होय. औषधे किंवा शस्त्रक्रियेऐवजी व्यायाम, मसाज आणि उष्णता किंवा विद्युत् उपकरणांसारख्या भौतिक साधनांचा वापर करून ही चिकित्सापद्धत शरिराच्या हालचाली, कार्यक्षमता अन् स्नायूंच्या समस्यांवर उपचार करते, ज्यामुळे दुखापतीनंतर किंवा आजारानंतर रुग्णाची हालचाल आणि जीवनमान सुधारते. ही उपचारपद्धत करणार्याला फिजिओथेरपिस्ट म्हणतात.)
थिरूवनंतपूरम् (केरळ) – ‘फिजिओथेरपी’ ही एक वैज्ञानिक आणि पुरावा-आधारित उपचार पद्धती आहे. म्हणून या क्षेत्रातील तज्ञांना पूर्ण स्वायत्ततेने काम करण्याचा अधिकार आहे, असे सांगत केरळ उच्च न्यायालयाने पात्र फिजिओथेरपिस्ट यांना त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ असे लिहिण्याची अनुमती दिली आहे. तसेच कोणत्याही अडथळ्याविना ते स्वतंत्रपणे वैद्यकीय व्यवसायही (प्रॅक्टिस) करू शकतात, असे स्पष्ट केले.
‘इंडियन असोसिएशन ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन’ने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. फिजिओथेरपिस्टना केवळ ‘तंत्रज्ञ’ किंवा डॉक्टरांचे ‘साहाय्यक’ म्हणून मर्यादित ठेवण्याची मागणी करणार्या युक्तीवादांना न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावले. विशेष म्हणजे यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये याच न्यायालयाने त्याच्या एका अंतरिम आदेशाने ‘फिजिओथेरपिस्ट’कडून ‘डॉक्टर’ या शब्दाच्या वापरास तात्पुरती बंदी घातली होती.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !