पणजीत शासकीय अधिकार्यांसाठी योगवर्गाचे आयोजन

पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – सध्याचे युग हे योगाचे आहे, असे उद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे काढले. पणजी येथे ‘इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेद अँड वेलनेस एक्स्पो अँड समिट २०२६’ कार्यक्रम चालू आहे. याअंतर्गत योगऋषी रामदेवबाबा यांनी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस्), भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी (आयपीएस्), पोलीस कर्मचारी, तसेच सर्व शासकीय अधिकारी यांच्यासाठी पणजीतील योग-सेतू येथे विशेष योगवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा ही परशुरामांची भूमी आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या राज्यात योगाला उज्ज्वल भविष्य आहे.’’ या वेळी त्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम रहाण्यासाठी सूर्यनमस्कार, तसेच विविध आसने यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी उपस्थितांकडूनही योगप्रकार करून घेतले. या प्रसंगी ‘पतंजलि उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण, ‘पतंजलि योग समिती’चे गोवा राज्यातील पदाधिकारी तथा ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’चे संयोजक श्री. कमलेश बांदेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी योगऋषी रामदेवबाबा यांनी ‘पतंजलि योग समिती’, तसेच आयोजकांपैकी अनेक मान्यवरांचा सत्कार केला.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग !
या योगवर्गासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, तसेच प्रा. महावीर श्रीश्रीमाळ हे या योगवर्गात सहभागी झाले होते.
हरिद्वारनंतर गोव्यात पतंजलीचे सर्वांत मोठे ‘वेलनेस सेंटर’ असेल !![]() हरिद्वार येथील ‘पतंजलि योगपिठा’नंतर आम्ही गोवा सरकारच्या साहाय्याने येथे पतंजलीचे सर्वांत मोठे ‘वेलनेस सेंटर’ उभारणार आहोत. या प्रस्तावित वेलनेस सेंटरमध्ये योग, आयुर्वेद, पंचकर्म, नैसर्गिक उपचार पद्धती, मानसिक आरोग्य, जीवनशैलीतील सुधारणा, तसेच आधुनिक वैद्यकीय उपचारांचा समन्वय साधला जाणार आहे. गोव्याचे हवामान, नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण हे आरोग्य अन् उपचार यांसाठी पूरक आहे. त्यामुळे गोव्याची आंतरराष्ट्र्रीय दर्जाचे ‘वेलनेस डेस्टिनेशन’(आरोग्यदायी पर्यटन स्थळ) म्हणून ओळख होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या सेंटरसाठी आवश्यक भूमी, टप्प्याटप्प्याने होणारे बांधकाम आणि कार्यान्वयाचा कालावधी यांविषयी गोवा सरकार आणि पतंजलि संस्था यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा चालू आहे. लवकरच अधिकृत घोषणा आणि सविस्तर आराखडा जाहीर करण्यात येईल. गोवा सरकारही आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेले उपचार तज्ञ, डॉक्टर, योगतज्ञ आणि इतर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करत आहे, अशी माहिती योगऋषी रामदेवबाबा यांनी या वेळी पत्रकारांना दिली. |
सनातन संस्थेकडून योगऋषी रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांची सदिच्छा भेट !

योगवर्ग झाल्यानंतर सनातन संस्थेकडून योगऋषी रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, तसेच प्रा. महावीर श्रीश्रीमाळ हे उपस्थित होते.

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !