
नवी मुंबई – महाराष्ट्र शासनाने सिडकोचे गृहनिर्माण विभागाचे महाव्यवस्थापक फैयाज खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासनात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती (मूळ नोकरी तशीच ठेवून तात्पुरत्या काळासाठी दुसर्या महत्त्वाच्या पदावर दिलेली नेमणूक) केली आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या माध्यमातून ही नियुक्ती २ वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर करण्यात आली आहे. वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २३(१) अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला. वक्फ मालमत्तांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि विकास या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी ३१ हून अधिक वर्षे ते सिडको मंडळामध्ये कार्यरत होते.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !