
सोलापूर – माघवारी निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. २४ जानेवारी या दिवशी दुपारी ३ वाजता सोलापूर येथील नॉर्थकोट प्रशाला मैदान, पार्क चौक येथे भव्य गोल रिंगण आणि प्रस्थान सोहळा होणार आहे. या वेळी सोलापूर शहर आणि परिसरातील ५८ दिंड्या अन् ५० भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, तसेच विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात येणार आहे. पालखी सोहळा नॉर्थकोट प्रशाला मैदानावर पोचल्यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे. यामध्ये पारंपरिक ध्वजधारी रिंगण, विविध रिंगणे आणि शेवटी अश्व रिंगण होणार असून सहस्रो भाविक उपस्थित रहाणार आहेत.
२५ जानेवारी या दिवशी पालखी सोहळा पुढील प्रवासास निघणार आहे. माघवारीच्या काळात कुरुल, पेनूर, सुस्ते आणि पंढरपूर येथे एकूण ५ रिंगण सोहळे होणार असून हा संपूर्ण सोहळा ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !