
वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या सूत्रावरून युरोपीय देशांवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय मागे घेतला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, आता डेन्मार्कसह कोणत्याही युरोपीय देशावर आयात शुल्क लावले जाणार नाही.
🇺🇸❄️ Trump Walks Back Greenland Tariff Threat
President Donald Trump has backed off his proposed tariffs on European allies over U.S. control of Greenland 🇬🇱
After talks with NATO leadership, both sides agreed on a framework for a future deal focused on Arctic security 🧊🛡️… https://t.co/Vo5whU1Ce1 pic.twitter.com/RTEFMAbo4A
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 22, 2026
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे चालू असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये केलेल्या भाषणातही त्यांनी ग्रीनलँड कह्यात घेण्यासाठी सैनिकी बळ वापरण्याच्या वक्तव्यापासून माघार घेतल्याचे सांगितले होते; मात्र ग्रीनलँड मिळवण्याचा उद्देश अद्याप कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मला ग्रीनलँड हवे आहे, पूर्ण अधिकार, मालकी आणि नियंत्रणासह’, असे त्यांनी म्हटले. त्याच वेळी यासाठी बळाचा वापर केला जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांची युरोपीय देशांवर टीका
भाषणात ट्रम्प यांनी युरोपीय देश आणि ‘नाटो’ (जगातील २९ देशांचा सहभाग असलेली सैनिकी संघटना) यांच्यावरही तीव्र टीका केली. ‘दुसर्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर अमेरिकेने युरोपला वाचवले. दशकानुदशके आम्ही जे दिले आहे, त्याच्या तुलनेत ही मागणी फारच लहान आहे. मी अधिक शक्ती आणि बळ वापरले, तर मला कुणीही रोखू शकणार नाही; मात्र तसे करण्याची आवश्यकता नाही आणि तसे करण्याची इच्छा नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !