
ठाणे – महानगरपालिका निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. येथील महानगरपालिकेमध्ये बहुमतासाठी ६२ आकडा आवश्यक असून शिंदेंच्या शिवसेनेकडे ५३ नगरसेवक आहेत. मनसेचे ५ आणि ठाकरे गटातून फुटलेले २ नगरसेवक मिळून शिवसेनेला पाठिंबा मिळाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गट नोंदणीच्या वेळी अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाने सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !