हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा

कोल्हापूर, २१ मार्च (वार्ता.) – हिंदु नववर्षाच्या शुभदिवशी (गुढीपाडवा) रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळावे, यांसाठी १९ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली श्री महालक्ष्मीदेवी आणि भगवान श्रीकृष्ण यांना साकडे घालण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीसह हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, महेंद्र अहिरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. अमर जाधव ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, सनातन संस्थेच्या सौ. मेघामाला जोशी यांसह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी आलेले काही भाविकही या प्रतिज्ञेत सहभागी झाले.
कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
वर्धा येथील ‘गोरस भंडारा’वरील ‘एफ्.डी.ए.’ची कारवाई अवैध !
संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !