बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, हे लक्षात घ्या !

‘जगात चमत्कार असे काही नसते. सर्व ईश्वरेच्छा, वाईट शक्ती आणि प्रारब्ध यांनुसार घडते; पण हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकारचे गुन्हे झाल्यावरचे हास्यास्पद उपाय !

‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून उपाय करायला हवेत, हेही सरकारला ज्ञात नसल्याने माणसाला सात्त्विक बनवणारी साधना शिकवण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हे इत्यादी करणार्‍यांना शिक्षा देण्यासारखे वरवरचे हास्यास्पद उपाय करते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ब्राह्मणांचा तिरस्कार करणाऱ्यांची अधोगती हाेण्यामागील कारण !

‘ब्राह्मणद्वेषामुळे ब्राह्मणेतर हिंदु धर्मापासून दूर गेले. त्यामुळे त्यांची सर्वच क्षेत्रांत परमावधीची अधोगती झाली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशांची नाेंद इतिहास घेईल का ?

‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्‍यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताचे अद्वितीयत्व लक्षात घ्या !

‘जगभरच्या विदेशी लोकांना भारताविषयी प्रेम वाटते, ते भारतात संत शिकवत असलेली साधना आणि अध्यात्म यांमुळे, राजकारण्यांमुळे नाही कि शासनकर्त्यांमुळे नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणार्‍या संघर्षासाठी भगवंतांच्या उपासनेतून सिद्ध झालेले आत्मबल वाढवा !

भविष्यात हिंदु राष्ट्र विरोधकांशी संघर्ष हा होणारच आहे. संघर्षाविना देशाला स्वातंत्र्यही मिळाले नाही, तर हिंदु राष्ट्र कसे मिळेल ? यासाठी आजपासून सर्व प्रकारची सिद्धता केली पाहिजे. संघर्षासाठी भगवंतांच्या उपासनेतून सिद्ध झालेले आत्मबल आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येकाने ईश्‍वरीय उपासना करायला हवी – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ अध्‍यात्‍माचा अभ्‍यास नको, तर प्रत्‍यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

‘अध्‍यात्‍माच्‍या अभ्‍यासाने केवळ अध्‍यात्‍माचे शाब्‍द़िक ज्ञान होते. थोडक्‍यात त्‍यामुळे केवळ पांडित्‍य येते. तेे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे कठीण असते. याउलट साधना केल्‍यास खर्‍या अर्थाने अध्‍यात्‍म जगणे होते. त्‍याने याच जन्‍मातही ईश्‍वरप्राप्‍ती करता येते.’ 

भारतियांसाठी हे लज्जास्पद !

‘एक सीताहरण झाल्यावर रामाने हरण करणार्‍या रावणाचा वध केला. याउलट हल्ली प्रत्येक वर्षी सहस्रो मुलींचे अपहरण होत असतांना त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीच नाही, तर कोणतेच सरकारही काहीच करत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारे श्रेष्ठ !

‘मला ‘हे हवे’, ‘ते हवे’, असे शासनकर्त्यांकडे मागणारे आणि ‘मला मत द्या’ असे जनतेकडे मागणारे राजकारणी देवाला आवडतील कि राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे देवाला आवडतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !

‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषी-मुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले