केवळ यानेच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशप्रेम म्हणजे सावरकर !

‘इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेतले जाते. बाकी कुणाचेच घेतले जात नाही.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नतद्रष्ट हिंदू !

‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संप्रदायांच्या प्रमुखांनो, हे लक्षात घ्या !

‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्‍वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवणारे वास्तव !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजबरीने हिंदूंना आपल्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘भारतातील हिंदू स्वतःचे आणि सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाहीत. असे हिंदू आणि सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचे कधी रक्षण करू शकेल का ? हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांची सुवचने

सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये अध्यात्मात प्रगती करण्याची क्षमता असल्यामुळे सर्वांनी झोकून देऊन प्रयत्न करावेत !

आजारावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी उपाय करणे आवश्यक, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते !

‘लहानपणापासून सात्त्विकता वाढवणारी साधना न शिकवल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी वाढले आहेत, हेही सरकारला कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनाे, हे लक्षात घ्या !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, धर्मातील वर्णांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हिंदु धर्मात चार वर्ण आहेत. त्यावर टीका करतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि इतर धर्मियांना कळत नाही की, सर्वच क्षेत्रांत तसे आहे. साधनेच्या संदर्भात इतके भेद असणे, हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले