‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश
‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एका ॲटम्बॉम्बमध्ये लाखो बंदुकांचे सामर्थ्य असते, तसे आध्यात्मिक बळामध्ये भौतिक, शारीरिक आणि मानसिक बळांच्या अनंत पटींनी सामर्थ्य असते. असे असल्यामुळे धर्मप्रेमींनी ‘संख्याबळ अल्प असतांना हिंदु राष्ट्र कसे होईल ?’, याची काळजी करू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आग घराजवळ येत असते, तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी धावपळ करतो. आता तिसरे महायुद्ध जवळ येत असल्याने त्यात जिवंत रहाण्यासाठी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञानाचा एक लाभ म्हणजे विज्ञानानेच विज्ञानाचे विश्लेषण खोडता येते आणि त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करता येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विमाने, रॉकेट, बॉम्ब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘लोकशाहीला जात्यंध आणि भ्रष्टाचारी जनता लायक नसल्याने देशाचे वाटोळे झाले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले