‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘तेजस्वी विचार’ वाचून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे ?’ याविषयी मार्गदर्शन मिळते ! – सौ. सरस्वती शंखवाळकर, (गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची मोठी बहीण)

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे माझे सर्वांत आवडते दैनिक आहे आणि मी प्रतिदिन ते वाचते. दैनिकाच्या पहिल्या पृष्ठावरील गुरुमाऊलींचे ‘तेजस्वी विचार’ हे सदर मी प्रथम वाचते. त्यातून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे’, याविषयी मार्गदर्शन मिळते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना हणजुणे, गोवा येथील श्री. बाबूराव गडेकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

हणजुणे, बार्देश, गोवा येथील श्री. बाबूराव गडेकर हे दुचाकी पायलट (दुचाकी टॅक्सीचालक) आहेत. साधना म्हणून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ।

अनेकदा विरोधाला धीरोदात्तपणे सामोरे जाते ।
लढवय्ये ते नेहमीच विजयश्री प्राप्त करते ।
शिवरायाचा मावळाच जणू ते भासते ।
म्हणूनच संत, ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळवते ।

इंग्लंड येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची साधिका कु. अ‍ॅलिस स्वेरदा हिने बालहनुमानाचे काढलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र

कु. ॲलिस विदेशातील असूनही त्यांना देवतेचे रूप अनुभवता येणे कल्पनातीत आहे. कु. ॲलिस यांच्या उदाहरणावरून एखाद्या साधकाला सूक्ष्म-दृष्टी कशी असू शकते, हे कळते !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ‘सनातन प्रभात’चे कार्यालय असलेल्या चैतन्यमय वास्तूत लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्‍चर्यकारक पालट !

‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक, तसचे आश्रमात वास्तव्यास असणारे आणि आश्रमात काही कालावधीसाठी येणारे संत अन् साधक यांना आश्रमात आल्यावर चैतन्याच्या स्तरावरील अनुभूती येत आहेत.

‘स्पिरिच्युयल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या) संकेतस्थळ पाहिलेल्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘नामजपामुळे माझ्या आयुष्यात बराच पालट झाला आहे. माझे अंतर्मन जागृत झाले आहे. मला आतून पुष्कळ चांगले वाटते. मला ‘अखंड नामजप करत रहावा’, असे वाटत आहे.’ – कु. ज्युली वॉसमन, ग्वाटेंग, दक्षिण आफ्रिका.

हनुमानाच्या जयंतीच्या दिवशी सकाळी एक वानर कुडाळ सेवाकेंद्राच्या आगाशीत येतांना दिसणे आणि ‘या वानराच्या रूपात प्रत्यक्ष मारुतिराया येऊन सर्वांना दर्शन देत आहे’, असे जाणवून पुष्कळ भावजागृती होणे

भारतीय संस्कृतीमध्ये प्राणी आणि पक्षी यांना विशेष महत्त्व आहे. काही प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होते. त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असते. या क्षमतेमुळे त्यांची ओढ अधिक सात्त्विक अशा वनस्पती, साधक, संत आणि वातावरण यांच्याकडे असते.

पानवळ-बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या गौतमारण्य आश्रमातील श्रीराम मंदिराचा जीर्णाेद्धार झाल्यापासून हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीवर होत असलेला किरणोत्सव !

पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील मारुतिरायांच्या मूर्तीवर पडणारे किरण उगवत्या सूर्यनारायणाचे आहेत. ते प्रथम हनुमंताच्या मुखमंडलावर पडतात आणि नंतर हळूहळू चरणांकडे जातात.

दास मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना साधकाला आलेल्या अनुभूती

मी मारुतिरायासमोर हात जोडून आणि डोळे मिटून उभा होतो. मी डोळे उघडून मूर्तीकडे पाहिल्यावर ‘मारुतिरायाच्या पापण्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले. ‘तो आमच्याकडे पहात असून त्याच्या मुखावरील हावभाव पालटत आहेत’, असे मला जाणवले.