१. ‘एस्.एस्.आर्.एफ .’ इंग्रजी फेसबूक
१ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांनी घेतलेले ‘ऑनलाईन’ नामजपाचे सत्र : ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांच्या समवेत ध्यान लावतांना मला चांगले आणि शांत वाटत होते.’ – कु. जेनिफर मँडरिनो, व्हरमाँट, अमेरिका.
१ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांनी घेतलेले ‘ऑनलाईन’ नामजपाचे सत्र : ‘नामजपामुळे माझ्या आयुष्यात बराच पालट झाला आहे. माझे अंतर्मन जागृत झाले आहे. मला आतून पुष्कळ चांगले वाटते. मला ‘अखंड नामजप करत रहावा’, असे वाटत आहे.’ – कु. ज्युली वॉसमन, ग्वाटेंग, दक्षिण आफ्रिका.
१ इ. ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या संत (पू.) सौ. भावना शिंदे यांनी घेतलेला ‘लाईव्ह स्ट्रीम (थेट प्रसारण)’ कार्यक्रम : ‘हा कार्यक्रम पाहून मी काही दिवस नामजप केला. नामजप केल्याने मला चांगले वाटत आहे. मला असणारा इसब (एक्झिमा) हा त्वचारोग काही प्रमाणात उणावला आहे. मला ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या साधिका सौ. क्रिस्टन हार्डि यांचा चांगला सत्संग मिळाला. ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्राथमिक टप्प्याच्या सत्संगांना (यात जिज्ञासूंना ‘एस्.एस्.आर्.एफ.चे कार्य, नामजप आणि स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन’ यांविषयी माहिती दिली जाते. – संकलक) मी ५ वेळा उपस्थित राहिले आहे. अन्य लोकांनाही मी या सत्संगांना घेऊन येण्याचा प्रयत्न करते. ‘पुढच्या पुढच्या टप्प्याच्या सत्संगांत कोणते विषय असतात ?’, हे मला जाणून घ्यायचे आहे.’ – कु. कानिका वासुदेव (मार्च २०२१)
|