शरणागत जिवाचे हृदय हेच भगवंताचे विश्रांतीस्‍थान

जिथे शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता असते, तिथेच भगवंत रहातो. हे केवळ भावामुळेच आपल्‍याला साध्‍य होऊ शकते.

प्रभु श्रीरामाच्‍या चरणी प्रार्थना करतांना त्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसणे

दुसर्‍या दिवशी मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्‍या वेळी त्‍यांनी परिधान केलेला पांढरा पायजमा आणि त्‍यांचे चरण पाहिल्‍यावर ‘ज्‍या चरणांनी मला कालची अनुभूती दिली, ते हेच चरण आहेत’, याची मला गुरुदेवांनीच प्रचीती दिली.’

प्रभु श्रीरामाविषयी भावजागृतीचे प्रयत्न करतांना दैवी बालकांचा भाव जागृत होऊन सूक्ष्मातून रामतत्त्वासमवेत हनुमानाचे तत्त्वही जाणवणे !

दैवी बालकांच्या सत्संगात दैवी बालकांना प्रभु श्रीराम आणि श्री हनुमानाविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .

साधकांनो, ‘समर्पणभाव’ वाढवून श्रीरामस्‍वरूप गुरूंच्‍या अवतारी कार्यात स्‍वतःला झोकून द्या आणि त्‍यांचे आज्ञापालन करून स्‍वतःचा उद्धार करून घ्‍या !

‘आपण भगवद़्‍कार्यात स्‍वतःला झोकून दिल्‍यास भगवंतालाच सर्वार्थांनी आपला उत्‍कर्ष करण्‍याची तळमळ लागते. तोच सर्वार्थांनी भार वाहून आपला उद्धार करतो. तो भक्‍तीसारखी अनमोल गोष्‍ट भक्‍ताला सहजतेने प्रदान करतो.’…..

श्रीरामनवमीच्‍या कालावधीत घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांतून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधिकांनी घेतलेले भावजागृतीचे प्रयोग अनुभवतांना ‘भावजागृती होत आहे आणि चैतन्‍य, आनंद अन् शांतीही मिळत आहे’, असे मला जाणवले. ज्‍या वेळी भावजागृती व्‍हायची, त्‍या वेळी असे वाटायचे, ‘देव आपल्‍यासाठी किती करत आहे ?…..

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सुश्री (कु.) महानंदा पाटील यांना श्रीरामाच्‍या संदर्भात आलेल्‍या विविध अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीरामाच्‍या चित्राकडे एकटक पहाणे आणि ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’, हे वाक्‍य उच्‍चारल्‍यावर चेहर्‍यावरील काळे आवरण दूर झाले’, असे जाणवून भाव जागृत होणे……

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी खारूताईच्‍या घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

श्रीरामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘श्रीरामरूपी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची वानररूपी साधकांवर असलेली कृपा आणि खारूताईचे उदाहरण अन् देवाला अत्‍यंत तळमळीने आळवणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला.

कवितारूपी मानसपूजा स्‍वीकारूनी द्यावे आशीर्वचन ।

वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्‍हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥

श्रीरामनवमीनिमित्त घेतलेल्‍या भावप्रयोगांमुळे साधिकेमध्‍ये झालेले पालट

गुढीपाडव्‍यापासून श्रीरामनवमीपर्यंत प्रत्‍येक सेवा आढाव्‍यानंतर दायित्‍व असणारी साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भावजागृतीचा प्रयोग घेण्‍यास सांगितले. त्‍यात प्रतिदिन एकेकाला भावजागृतीचा प्रयोग घेण्‍याची संधी मिळाली.

सामूहिक भावजागृतीचे प्रयोग घेतल्‍याने आसपासचे वातावरण पालटून तेथे प्रत्‍यक्ष भगवंत आल्‍याची साधिकेला आलेली प्रचीती !

चैत्र नवरात्री आरंभ ते श्रीरामनवमी या कालावधीत ‘महर्षी अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विभागातील एका साधिकेने प्रतिदिन भावजागृतीचा प्रयोग सांगायचा आणि सर्वांनी भाव अनुभवायचा’, असे ठरले होते.