मादळमोही (जिल्हा जालना) येथे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापार्‍यास हात-पाय बांधून कालव्यात फेकले !

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे यांचे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ५ ते ६ जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले. त्यानंतर तोंडात बोळा कोंबून आणि हातपाय बांधून त्यांना मारहाण करत वडीगोद्रीजवळ पाटात फेकून दिले.

हे समाजघातकी सरकार लवकर रसातळाला जावो !

सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुपर मार्केटमध्ये मद्यविक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे, असा समाजघातकी निर्णय घेणारे सरकार लवकर रसातळाला जावो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, अशी तीव्र उद्वीग्नता ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.

सर्वाेच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रहित !

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य आणि तर्कहीन ! – सर्वाेच्च न्यायालय

४५ बनावट आधुनिक वैद्यांच्या विरोधात गुन्हे नोंद !

सर्वत्रच्या बनावट आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई हवी !

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

नाशिक येथे महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीत मृत्यू !

नाशिक येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे-जाधव यांचा चारचाकी वाहनामध्ये जळून मृत्यू झाला आहे. वाजे या मोरवाडी रुग्णालयात कार्यरत होत्या. वाडीवर्‍हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका असे गांधीजींची ३ माकडे ! – गिरीश महाजन, आमदार, भाजप

महावितरण पुष्कळ तोट्यात आहे, त्यामुळे ‘वीजदेयके भरा’, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांकडून वारंवार करण्यात येत आहे, तर दुसरीकडे देयके थकलेल्यांची वीजजोडणी कापण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची ऐन हंगामात हानी होत आहे.

प्रतिदिन सकाळी सामूहिक राष्ट्रगीत झाल्यानंतरच सर्व व्यवहार चालू करणारे भिलवडी (जिल्हा सांगली) येथील व्यापारी आणि ग्रामस्थ !

राष्ट्रगीताच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि नव्या पिढीला ऊर्जा मिळावी, या उद्देशाने स्थापनेच्या दिवसापासून आम्ही राष्ट्रगीत चालू केले आहे.

तारापूर (जिल्हा ठाणे) येथे गोहत्या करणार्‍या कसायांकडून पोलिसांवर सशस्त्र आक्रमण, ३ पोलीस कर्मचारी घायाळ

गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे सरकारला लज्जास्पद !

गाय वाचवली, तर देश वाचेल ! – राजेंद्र लुंकड, गोविज्ञान संशोधन संस्था

त्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना सांगून गोमूत्र आणि शेण यांच्या आधारे म्हणजेच गायीवर आधारित शेती अन् सेंद्रिय शेती करण्यास शिकवले. सेंद्रिय शेतीतून प्रतिदिन सहस्रोंचा लाभ कसा करून घ्यावा, याविषयी त्यांचे प्रबोधन केले.