नीमच पाकिस्तानमध्ये आहे का ?

नीमच (मध्यप्रदेश) येथील जुनी कचेरी परिसरात १६ मेच्या रात्री धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथील दर्ग्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावरून त्यांनी आक्रमण केले.

हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

काश्मीरमध्ये रहाणाऱ्या काश्मिरी हिंदूंना ‘लष्कर-ए-इस्लाम’ नावाच्या जिहादी आतंकवादी संघटनेने ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला सिद्ध व्हा’, अशी धमकी एका पत्राद्वारे दिली.

संपूर्ण देशातच अशी कारवाई करावी !

‘माझ्याकडे कर्नाटक राज्यातील अवैध चर्च यांची माहिती आहे. मी सरकारला विनंती करीन की, अशी अवैध चर्च पाडून टाकण्यात यावीत’, अशी मागणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.

आतंकवाद्यांना धर्म असतो !

जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट आखला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिली.

निधर्मीवादी गप्प का ?

वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेवरून चिंतित आहेत. त्यांनी त्यांच्या या संदर्भातील निकालातही याचा उल्लेख केला आहे.

सर्वच मंदिरे सरकारीकरण मुक्त करा !

पाच लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती पुजाऱ्यांकडे सोपवावीत. यापुढे तेच या मंदिरांची देखभालही करतील, असा निवाडा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला.

कॉन्व्हेंटमध्ये भगवद्गीता शिकवणार का ?

मुंबईतील भायखळा येथील ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मे २०२२ समर कॅम्प’मध्ये बायबल शिकवले जाणार आहे.

निधर्मीवाद्यांना न्यायालयाची चपराक !

ज्या लोकांना वाटते की, पाकिस्तान त्यांच्यासाठी योग्य जागा आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात त्यांच्या विरोधात कधी काही चुकीचे घडलेले नाही, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने केले आहे.

अशांवर कठोर कारवाई करा !

वडोदरा (गुजरात) येथील महाराजा सयाजीराव विश्वविद्यालयातील ‘फाइन आर्ट्स’च्या संदर्भातील एका प्रदर्शनात देवतांची चित्रे बनवण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कागदांचा वापर करण्यात आला. यातील बहुतेक कागदांवर बलात्काराच्या घटनांच्या बातम्या होत्या.

या प्रतीकांचे रक्षण करा !

ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदूंच्या मंदिराशी संबंधित असलेली प्रतीके ‘तेथे मंदिर होते’, हे लक्षात येऊ नये; म्हणून ती नष्ट करण्यात येत आहेत, असा आरोप या संदर्भातील खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी केला आहे.