मोगलांचे वंशज अद्यापही जिवंत !

छत्तीसगडच्या नन्हेंसर गावामध्ये २३ मेच्या रात्री एका प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंग चोरीला गेले. दुसऱ्या घटनेत गौहत्ती (आसाम) येथे अज्ञातांनी दोन मंदिरांत तोडफोड करून तेथील शिवलिंग काढून नाल्याजवळ फेकले.

यांच्यावर कारवाई कधी होणार ?

बेंगळुरू येथील कर्नाटक उच्च न्यायालयात ज्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश बसतात, त्या ठिकाणी २ महिलांनी नमाजपठण केल्याचा एक व्हिडिओ ‘संवाद’ या यू ट्यूब चॅनवरून प्रसारित करण्यात आला.

ओवैसी कुणाचे वंशज आहेत, हे ते सांगतील का ?

‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी कोणताही संबंध नाही; मात्र हे सांगा की, मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. 

पंजाबमधील हिंदुद्वेषी खलिस्तान्यांना रोखा !

भठिंडा (पंजाब) येथे अज्ञातांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्या. पोलिसांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिकांची जळलेली पाने जप्त करून चौकशी चालू केली आहे. यामागे खलिस्तानी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंदिरांच्या झालेल्या मशिदीही हिंदूंना पूजेसाठी मिळाव्यात !

भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणार्‍या आणि बंद असणार्‍या धार्मिक स्थळांना पूजा करण्यासाठी उघडण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. या संदर्भातील कायद्यातही सुधारणा केली जाऊ शकते.

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे कुठे आहेत ?

राजगड (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधील मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. तसेच या आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई करून ती पाडून टाकण्यात आली.

अखिलेश यादव यांचा हिंदुद्रोह जाणा !

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी, ‘हिंदु धर्मानुसार कुठेही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा. झाले मंदिर सिद्ध !’, असे विधान ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडण्याविषयी केले.

धर्मनिरपेक्ष ‘आप’कडून अल्पसंख्यांकांचे होणारे लांगूलचालन जाणा !

देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने सर्व खासगी शाळांतील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क परत करण्याचा आदेश दिला आहे. हे शुल्क देहली सरकार स्वत: भरणार आहे.

नीमच पाकिस्तानमध्ये आहे का ?

नीमच (मध्यप्रदेश) येथील जुनी कचेरी परिसरात १६ मेच्या रात्री धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथील दर्ग्याजवळ श्री हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावरून त्यांनी आक्रमण केले.

हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

काश्मीरमध्ये रहाणाऱ्या काश्मिरी हिंदूंना ‘लष्कर-ए-इस्लाम’ नावाच्या जिहादी आतंकवादी संघटनेने ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला सिद्ध व्हा’, अशी धमकी एका पत्राद्वारे दिली.