जुन्नर (पुणे) येथे बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळून आला !

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी ‘ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीन’मध्ये निरोध, तंबाखू, गुटखा, दगड कोंबलेले सामोसे मिळाले होते. त्यानंतर आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर मिळाला आहे;

वसंतगड (कराड) येथे २४ एप्रिलपासून ‘शिवसंस्कार शिबिरा’चे आयोजन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जन्मगाव असलेल्या तळबीड येथे वसंतगड मोठ्या दिमाखात उभा आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास प्रारंभ  !

कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास १४ एप्रिलला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

हरियाणातील राखी गढी येथे साडेचार सहस्र वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृह सापडले !

हरियाणातील राखी गढी येथे हडप्पा संस्कृतीतील सर्वांत पुरातन वसाहतीच्या उत्खननाला मोठे यश आले आहे. साडेचार सहस्र वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृह मातीच्या लोट्यासह (तांब्यासह) सापडले आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची तक्रार !

राजकीय नेते आणि उमेदवार यांनी लहान मुलांना हातात धरून, वाहनात किंवा फेरीत घेऊन जाणे, तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

खोपोली येथील सनातन संस्थेच्या अध्यात्म कार्यशाळेला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला खोपोली येथील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

माजरी (जिल्हा चंद्रपूर) येथे अन्नातून विषबाधा झाल्याने १५० नागरिक रुग्णालयात भरती !

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याने अनुमाने १५० जणांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील जोडपी पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी विवाह करतात ! – अभिनेत्री नोरा फतेही

हिंदी चित्रपटसृष्टीतील (बॉलीवूडमधील) जी जोडपी विवाह करतात, त्यांच्यात खरे प्रेम असत नाही. ती केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी विवाह करतात, असे मत अभिनेत्री नोरा फतेही यांनी एका मुलाखतीत मांडले.

राज्यभरात सध्या २ सहस्र ९३ टँकरनी पाणीपुरवठा चालू !

मराठवाडा विभागात १ सहस्र ६३, नाशिकमध्ये ४८१, पश्चिम महाराष्ट्रात ४२३, मुंबईत ८४, अमरावतीत ४० आणि नागपूर विभागात २ टँकरनी पाणीपुरवठा होत आहे.

पुणे विद्यापिठाकडून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये १२ एप्रिल या दिवशी होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला.