
सप्टेंबर २०२४ मध्ये एकदा मला सर्दीसाठी होमिओपॅथी वैद्यांनी काही औषध दिले. दुसर्या दिवशी सर्दी वाढल्याने मी त्यांना तसा आढावा दिला. तेव्हा त्यांनी औषधांची मात्रा न वाढवता ती न्यून केली. तिसर्या दिवशीही सर्दी न्यून न झाल्याने त्यांनी पुन्हा मात्रा पुष्कळ न्यून करून एक दिवस आड औषध घ्यायला सांगितले. त्यानंतर माझी सर्दी लगेचच दूर झाली. त्या वेळी मला वाटले, ‘होमिओपॅथी वैद्य औषधांची मात्रा वाढवण्याऐवजी ती न्यून करून आजारपण दूर करतात, म्हणजे ‘ते औषध अधिक सूक्ष्म स्तरावरचे असावे.’ हे सूत्र त्या वेळी माझ्या स्मरणात राहिले आणि ‘सूक्ष्म अधिक परिणामकारक असते’, हे मनावर बिंबले गेले.
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह.
(‘वरील लिखाण योग्य आहे. रोगावर अधिक मात्रेत औषध दिले असल्यास त्यामुळे त्रास आणि लक्षणे वाढतात. अशा वेळी औषधांची मात्रा न्यून केल्यास रुग्णाला आराम मिळतो.’ – होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता)
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनी चक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनीचक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
वातावरणात पालट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस पाळायचे ५ नियम !
प्रसुतीनंतरची कमजोरी आणि स्त्री आरोग्य : आयुर्वेदाचे उपचार अन् मार्गदर्शन