हिंदूंच्या आत्मघातकी धोरणाचा भारतवर्षावर झालेला दुष्परिणाम !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

‘परका शत्रू येता आम्ही आहोत १०५’, हे महाभारतातील सूत्र आम्ही विसरलो, तर त्याचे राष्ट्रीय दुष्परिणाम काय झाले  ?, याविषयी प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी इतिहासातील उदाहरणे देऊन त्याचे केलेले विश्लेषण पुढीलप्रमाणे –

जयचंद राठोडाने मग पृथ्वीराजाचा पराभव करण्यासाठी शहाबुद्दीन घोरीचे साहाय्य घेतले नसते. राणा प्रतापाच्या विरोधात राजा मानसिंग अकबराला मिळाला नसता. मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबासाठी छत्रपती शिवरायांना पराभूत करण्यात आनंद न मानता शिवछत्रपतींचेच चुलत बंधू, तसेच इतर आदिलशाहचा पक्ष धरून हिंदूंचे स्वराज्य स्थापन करणार्‍या वीर पुरुषाच्या विरोधात उभे राहिले नसते. राजारामाला पकडण्यासाठी गणोजी शिर्के यांनी झुल्फिकारखानाला साहाय्य केले नसते. मल्हारराव होळकर यांनी स्वतःचे महत्त्व टिकून रहावे; म्हणून सदाशिवराव भाऊंच्या विरोधात नजिबखान रोहिल्याला जवळ केले नसते. राघोबा नाना फडणीस यांच्या विरोधात इंग्रजांना मिळाला नसता; पण असे घडले नाही. त्याच त्याच प्रकारच्या आत्मघातकी घटना घडत राहिल्या आणि धर्म-संस्कृती यांत असाधारण श्रेष्ठता असलेला भारतवर्षही परकियांच्या दास्यात ११०० वर्षे खितपत राहिला. अजूनही आपण आपले हे आत्मघातकी धोरण सोडले आहे, असे दिसत नाही. अन्यथा काश्मीर खोर्‍यातून हिंदु समाजाला विस्थापित व्हावे लागण्याचा दुर्दैवी प्रसंग आपणावर ओढवला नसता वा रामजन्मभूमीचा वाद विकोपाला गेला नसता, असो.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशस्वी चरित्रात श्रीकृष्णाची राजकारणी वैशिष्ट्ये दिसून येणे !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशस्वी चरित्राचा नीट अभ्यास केला, तर श्रीकृष्णाचे जीवन त्यातही भगवंताची राजकारणी वैशिष्ट्ये शिवरायांनी आपल्यापुढे सातत्याने ठेवली आहेत, असे दिसून येते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘भगवान श्रीकृष्ण एक दर्शन’ या ग्रंथातून)