‘श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार’ प्रदान सोहळा आणि विविध कार्यक्रम

पुणे, १८ जानेवारी (वार्ता.) – श्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती आणि कोथरूड यांच्या वतीने माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल षष्ठी या काळात (दिनांक १९ ते २४ जानेवारी २०२६) सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात ‘श्री गणेश जयंती वार्षिक उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसमवेतच ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
या महोत्सवात प्रतिदिन सकाळी महिलांचे सामुदायिक सूक्त पठण, २२ जानेवारीला सकाळी ९ वाजता ‘श्री गणेश याग’, तर सायंकाळी ६.१५ वाजता श्री. सुहासराव हिरेमठ, डॉ. गुरुदास नूलकर, श्री. मुकुंद संगोराम आणि डॉ. अंजली पर्वते यांची व्याख्याने होतील. रात्री ७.४५ वाजता शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि २४ जानेवारीला ह.भ.प. निवृत्ती महाराज मूकनायक यांचे कीर्तन होणार आहे. याच काळात संस्थानांतर्गत असलेल्या
श्री दशभूजा गणपति (पौड फाटा) आणि श्री रमणा गणपति (लक्ष्मीनगर) मंदिरातही श्री गणेश याग आणि भजन यांचे कार्यक्रम होतील. २३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते मा. महामहोपाध्याय आर्. मणि द्रविड शास्त्री आणि मा. डॉ. कुटुंब शास्त्री यांना ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात येईल.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र