
कोल्हापूर – ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे ब्रीद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९१५ मध्ये स्थापन केलेल्या ‘अखिल भारत हिंदु महासभा’ या राष्ट्रीय संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी हुपरी येथील श्री. रमेश दत्तात्रय भोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जनहितासाठीचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि हिंदुत्वनिष्ठ विचारधारेवरील ठाम भूमिका यामुळे ते जनतेत विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याची नोंद घेत संघटनेने त्यांना हे दायित्व दिले आहे.
सदर नियुक्ती अखिल भारत हिंदु महासभेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय सणस यांच्या हस्ते श्री. रमेश भोरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी प्रदेश सचिव श्री. नंदकुमार घोरपडे, जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, जिल्हा प्रवक्ता श्री. सुनील सामंत यांच्यासह हिंदु राष्ट्र समितीचे तालुका समन्वयक श्री. नितीन काकडे, महिला आघाडीच्या तिलोत्तमा खानविलकर, महिला संघटक स्मिता दळवी, श्री. महादेव आडावकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !