‘मुंबई’ असे लिहिण्याची चेतावणी !

ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील प्रसिद्ध ‘बॉम्बे ढाब्या’चा फलक मनसेने फाडला. ८ जानेवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे जिल्हा दौर्यावर असतांना त्यांची दृष्टी ‘बॉम्बे ढाबा’ असे लिहिलेल्या फलकावर पडताच कार्यकर्त्यांनी तात्काळ फलक फाडला. या वेळी ढाब्याच्या मालकाला ‘बाँबे’ऐवजी ‘मुंबई’ नाव लावण्याची चेतावणी देण्यात आली. ‘नाव पालटले नाही, तर ढाब्यावर कारवाई करू’, अशी चेतावणी मनसैनिकांनी दिली आहे. अंतिमतः ढाब्याच्या मालकाने फलक पालटण्याचे आश्वासन दिले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !