गोरक्षकांवर जिहाद्यांनी केलेल्या आक्रमणाविरोधात काळेपडळ (पुणे) येथे पोलिसांना निवेदन

असुरक्षित गोरक्षक !

पुणे, ४ जानेवारी (वार्ता.) – काळेपडळ येथील गोरक्षक बाळा निकम आणि बाळा पांचाळ यांच्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री जिहाद्यांनी जीवघेणे आक्रमण केले. याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर अन् पोलीस ठाण्याच्या परिसरात जिहाद्यांनी या दोघांना पुन्हा मारहाण केली.

काळेपडळ(पुणे) पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाची प्रत

या प्रकरणी येथील हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले असून बजरंग दलाचे जिल्हा गोरक्षाप्रमुख गणेश शिंदे यांनी याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करून घेण्यासाठी निवेदन दिले. तक्रार नोंद करण्यासाठी गेले असतांना जिहाद्यांनी ठाण्याच्या परिसरातच गोरक्षकांना मारहाण केली आणि उघडपणे जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.