पंढरपूर येथील मंदिरामध्ये श्री गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचे प्रकरण

पंढरपूर – उत्तरद्वार येथील लाडू केंद्रासमोरील गणपति मंदिरातील श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात यावी, असे पत्र मी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला दिले होते. त्यावर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी मुहूर्त नसल्याने ‘श्रीगणेश जयंतीपूर्वी प्राणप्रतिष्ठापना होऊ शकत नाही’, असे उत्तर दिले. एकीकडे ‘श्रीगणेश जयंतीपूर्वी मुहूर्त नाही’, असे म्हणणारी मंदिरे समिती ‘३७ परिवार देवतांची प्राणप्रतिष्ठापना कशी काय करत आहे ?’, असा प्रश्न श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. गणेश लंके म्हणाले,
१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील परिवार देवतांच्या प्राणप्रतिष्ठाना करण्याविषयी मंदिरे समितीला मी ८ डिसेंबर २०२५ या दिवशी माहिती अधिकाराच्या अंतर्गत एक आवेदन केले होते. यानंतर १ जानेवारी या दिवशी एका वृत्तवाहिनीवर मंदिरे समितीकडून येत्या ८ ते १० दिवसांत ३७ परिवार देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, असे वृत्त पहाण्यात आले.
२. एकीकडे पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त नाही; म्हणून मला ‘श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना करता येणार नाही’, असे सांगितले जाते, तर येत्या ८ दिवसांत समिती कोणत्या पंचांगातील मुहूर्ताच्या आधारे परिवार देवतांची प्राणप्रतिष्ठापना करत आहे ?
३. यावरून मंदिरे समिती सरळसरळ भक्तांची दिशाभूल करत आहे, हेच सिद्ध होते.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा