२० ते २३ मार्च या कालावधीत ‘गौ-टेक २०२६’ प्रदर्शनाचे आयोजन !
पुणे – गोमाता ही केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून ती राष्ट्राच्या आर्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा आधार आहे. हेच सत्य जगासमोर मांडण्यासाठी पुण्यात २० ते २३ मार्च या कालावधीत ‘गौ-टेक २०२६’ या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद यांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्या या उपक्रमातून गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र यांवर आधारित उद्योगांचे जागतिक दर्शन घडणार आहे, अशी माहिती नुकतीच पुणे येथील पत्रकार परिषदेत ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी दिली.
पत्रकार परिषदेला मित्तलभाई खेताणी, रमेशभाई घेटिया, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. दिलीप कुलकर्णी यांसह अनेक गो-भक्त आणि मान्यवर उपस्थित होते.

श्री. कथीरिया यांची सनातन संस्थेच्या वतीने अनौपचारिक भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२६’ भेट देण्यात आले.
गोमाता – जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू !
‘ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काउ-बेस्ड इंडस्ट्रीज’द्वारे आयोजित या प्रदर्शनाविषयी माहिती देतांना राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया म्हणाले की, गायीवर आधारित उद्योगांना आणि नव्या तंत्रज्ञानाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनात ३०० हून अधिक कक्ष असतील, जिथे गो-उत्पादनांपासून बनवलेल्या विविध वस्तू आणि तंत्रज्ञान यांची माहिती दिली जाईल.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये !
सर्व हिंदु बांधव आणि नागरिक यांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषद : ‘गौ-आधारित’ उद्योगांमधील नवनवीन कल्पनांवर जागतिक तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी