वल्लभनगर (पुणे) डेपो येथे ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी प्रशासनाला आवाहन !

एस्.टी. डेपो नियंत्रण कक्षांचे ‘संपर्क क्रमांक’ सक्रीय रहावेत, यासाठी आगारप्रमुखांना निवेदन !

श्री. व.य. रावते यांना निवेदन देतांना डावीकडून श्री. शैलेंद्र शिंदे, सौ. सावनी शिंदे, श्रीमती पल्लवी पाटील, श्री. सुरेंद्र महाजन

पुणे, २६ डिसेंबर (वार्ता.) – एस्.टी. डेपो नियंत्रण कक्षांचे संपर्क सक्रीय रहावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत वल्लभनगर येथील आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले. प्रवाशांच्या सुविधेसाठी गाड्यांची अद्ययावत माहिती मिळावी, म्हणून प्रत्येक डेपोमध्ये अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध असतो; पण काही ‘डेपो’मध्ये असे निदर्शनास आले आहे की, हा क्रमांक दीर्घकाळ निष्क्रीय असतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे परिवहन विभागाने यासंबंधीची पडताळणी करून त्याविषयी योग्य ती कार्यवाही करावी. या आशयाचे निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री सुरेंद्र महाजन, रघुनाथ ढोबळे, शैलेंद्र शिंदे आणि सौ. सावनी शिंदे यांनी श्रीमती पल्लवी विराज पाटील, आगार व्यवस्थापक आणि श्री. व. य. रावते वाहतूक नियंत्रक, वल्लभनगर डेपो यांना निवेदन दिले.