अल्पसंख्यांक सेलच्या मागणीनंतर आमदार शेखर निकम यांनी केले प्रयत्न

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी मशीद आणि मंदिर धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्यासाठी एक वर्षाची अनुमती मिळावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली होती. ही मागणी निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावली. त्यामुळे आता एक वर्षाच्या कालावधीसाठी मशीद आणि मंदिर धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती मिळाली आहे.
अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार निकम यांच्या उपस्थितीत सावर्डे येथे झाली होती. या वेळी धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्यासाठी एक वर्षासाठी अनुमती देण्याची मागणी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी केली होती.
संपादकीय भूमिकामुसलमान दिवसांतून ५ वेळा भोंग्यांवरून अजान (नमाजासाठी बोलावणे) देतात. आता त्यांच्या आवाजाच्या मर्यादेकडे कोण लक्ष ठेवणार ? प्रत्येक मशिदीवर भोंगे असतात, तसे हिंदूंच्या प्रत्येक मंदिरांवर भोंगे नसतात आणि असलेल्या मंदिरावर किती वेळा भक्तीगीते लावली जातात ? याचा विचार करता अनुमतीचा लाभ मुसलमानांनाच मिळणार हेच स्पष्ट होते ! |
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !