भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास यांचे विधान !

नवी देहली – केंद्र सरकार चलनी नोटांवरील महात्मा गांधींचे छायाचित्र काढून टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत असून त्याजागी भारताचा वारसा असलेले चिन्हे लावण्याविषयी चर्चा चालू आहे, असे विधान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. गांधींचे नाव असलेल्या ‘मनरेगा’ या योजनेचे नाव केंद्र सरकारने नुकत्याच पालटल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटास यांनी हे विधान केले आहे. यासाठी उच्चस्तरीय बैठकाही झाल्याचाही दावा त्यांनी या वेळी केला. ब्रिटास पुढे म्हणाले की, चलनी नोटांवरून गांधींचे चित्र काढून टाकणे, हे केवळ अनुमान नाही. त्यांचे चित्र काढून टाकणे, हा देशाच्या प्रतीके पालटण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
🚨 Rumour or Reckless Politics?
CPI MP John Brittas claims the Central Government plans to remove Mahatma Gandhi’s image from currency notes.
❓ On what evidence was this said?
⚠️ Spreading unverified claims fuels panic and mistrust.
If proven to be a rumour, the govt must… pic.twitter.com/mJmGNcRmIQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 25, 2025
रिझर्व्ह बँकेने वृत्त फेटाळले !
एका अधिकृत निवेदनात भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘गांधीजींच्या प्रतिमेऐवजी इतर कोणत्याही व्यक्तीमत्त्वाची प्रतिमा वापरण्याचा कोणताही प्रस्ताव नाही’, असे स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिकाब्रिटास यांनी कशाच्या आधारे हे विधान केले ?, याची सरकारने चौकशी करावी आणि त्यांनी अफवा पसरवल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना कारागृहात टाकावे ! |
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !