श्री महालक्ष्मी दर्शनमार्ग सुलभ होण्यासाठी मूळ योजनेत होणार पालट

मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती !

मुंबई येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर

मुंबई – येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आणि भोवतालच्या परिसरात इतर, तसेच सणासुदीच्या दिवसांत भाविकांची प्रचंड गर्दी असते. अपुरी जागा आणि मंदिराकडे जाणारा एकमेव अरुंद मार्ग, हे लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाच्या मूळ योजनेत विशिष्ट पालट करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे; मात्र ‘योजनेतील दुरुस्तीचा आणि संबंधित पुनर्विकासाचा उपयोग हा केवळ भाविकांसाठी उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी होईल. त्याचा  व्यावसायिकीकरणासाठी वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी’, असे उच्च न्यायालयाने श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टला सांगितले आहे.