
तुळजापूर, २१ डिसेंबर – श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा २० डिसेंबर या दिवशी चालू झाली. अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानीदेवी शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. तत्पूर्वी सकाळी सेवेकरी पलंगे यांनी देवीचा चांदीचा पलंग स्वच्छ धुवून घेतला आणि पलंगावर नवीन नवार पट्टया बांधून घेतल्या. आता देवीचे सर्व नित्योपचार पलंगावरच होत असून नैवेद्य, अभिषेक हे सर्व धार्मिक विधी परंपरागत पद्धतीने चालू असतात, तर अभिषेक मात्र दही-दुधा ऐवजी सुगंधी तेलाने घालण्यात येतो. देवीची ही निद्रा आता २८ डिसेंबरअखेर चालेल. या दिवशी पहाटे देवी सिंहासनावर परत विराजमान होईल, तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर