मतदार सूचीमधील कथित घोळामुळे कार्यकर्ते संतप्त !

मुंबई – मतदार सूचीमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच ही घटना घडल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. मतदार सूचीमधील कथित घोळांमुळे कार्यकर्त्यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि कायदा अन् सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
सपाट भूमीवर इमारती दाखवून मतदारांची नोंदणी !
मनसेचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासून कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. तिथे त्यांनी मतदार सूचींमधील त्रुटींवर आक्षेप घेत आंदोलन चालू केले होते. मतदार सूचीत अनेक मतदारांची नावे दुबार आलेली आहेत, तसेच जे मतदार हयात नाहीत, त्यांची नावेही सूचीत आहेत. जिथे सपाट भूमी आहेत, तिथे इमारती दाखवून मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत, अशा अनेक तक्रारी त्यांच्या होत्या.
कार्यकर्ते संतापले !मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अधिकार्यांनी केवळ ‘तुमचे प्रश्न सोडवले जात आहेत’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. या वेळी निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळही चालत नव्हते. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड करायला प्रारंभ केला. |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !